पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०७.२०२२
निगडी- काही दिवसांपूर्वी गावठी दारू पिऊन दारूबंदी असणाऱ्या गुजरातमध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले तसाच प्रकार पिंपरी मध्ये घडल्यानंतर गृहखाते जागे होणार का ? असा प्रश्न सध्या येथील नागरिकांना सतावत आहे.पिंपरी- निगडी भागांत अवैध धंदे जोमाने वाढत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. निगडी सेक्टर नं.२२ स्मशान भुमीजवळ वसाहतीच्या कमानी बाजुला गावठी दारू, मटका, जुगार असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलीसांकडून यावर कसलेच नियंत्रण नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील बहुतेक सर्वच भागात असे चित्र पहावयास मिळत असल्याने शहरातील दारू, मटका, जुगार इ. अवैध धंदे कमी होण्या ऐवजी अवैध मार्गाने वाढतच असल्याचे दिसत आहे. धंद्यामागे आर्थिक धागेदोरे असल्यानेच पोलीस या प्रकरणाकडे डोळेझाक करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



















