सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०८.२०२२
पाटण- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे मा. प्राचार्या सौ.छायादेवी जगदाळे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सेवानिवृत शिक्षक श्री.दत्तात्रय जगदाळे, उपमुख्याध्यापक श्री.ए .ए . भांगरे प्रभारीपर्यवेक्षक विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी मा. प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायले. स्वातंत्यदिनाच्या व अमृत महोत्सवी वर्षानिमित विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गितांवर नृत्य सादर केले.त्यानंतर पाटण नगरपंचायत येथील ध्वजारोहणास सर्वजण उपस्थित राहिले. नगरपंचायत येथे कला शिक्षक श्री.अमर भागवत व लेझीम पथकातील विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रात्यक्षिक सादर केले. नंतऱ पाटण शहरातून प्रभातफेरी मोठया उत्साहात काढण्यात आली.



















