रायगड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०८.२०२२
रायगड- उरण सामाजिक संस्थे मार्फत उरण शहरातील मोठी समस्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अवैध पार्किंग या गंभीर विषयावर रविवार बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत रस्त्यावरील अवैध कंटेनर पार्किंग व ट्रॅफिक जाम संदर्भात सर्वच उपस्थीतांनी तीव्र नाराजी व रोष प्रकट करून त्यावर लवकरात-लवकर तोडगा काढण्यात यावा असे सुचवण्यात आले होते, त्यानुसार बैठकीत ठरल्याप्रमाणे गुरुवार दि. २५ ऑग. २०२२ ऱोजी JNPT मल्टीपरपज हॅाल टाऊनशीप येथे सर्वसमावेशक बैठकीचे आयोजन केले आहे. याबाबत उरण सामाजिक संस्थेकडून विभागीय आयुक्त, कोकण विभाग, पोलीस उपायुक्त आणि वाहतूक विभाग यांना बैठकिचे निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी आपल्या समस्या व त्यावरील सूचना-उपाय मांडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी उरण सामाजिक संस्थेकडून सर्वांना आव्हान करण्यात आले आहे.



















