ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निषेध मोर्चा.
मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिंलीद राऊत
दि.०९.१०.२०२२
ठाणे – रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध नोंदवावा असे आदेशित केल्याप्रमाणे प्रमाणे ठाणे जिल्हा कार्यकारणीच्या वतीने निमंत्रक आनंद नवसारे यांच्यासह नवी मुंबई जिल्हाप्रमुख ख्वाजामिया पटेल यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुद्ध धम्मावर केलेल्या चूकीच्या वक्तव्या विरोधात मंगळवारी सकाळी ११.०० वा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निषेध आंदोलन करून प्रशासकीय अधिकाऱ्याला निवेदन देण्यात येईल.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाईलाजास्तव बौद्ध धम्म स्वीकारला” असे बेताल वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केल्याने तमाम बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाहीर निषेध नोंदवावा व आरएसएस च्या दलाल असलेल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. असे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.



















