रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनीधी, अमित साहू
दि.१६.१०.२०२३
रायगड- उरण राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत पक्षाचे नेते जिल्हा सरचिटणीस तथा उलवे शहर निरीक्षक श्री. किशोर ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आदिवासी, आजारी लोकांना फल वाटप कार्यक्रम केला तसेच गोर-गरीब विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत केक कापून गोर-गरीब वस्तीत अन्नदान करून त्यांच्या समवेत केक कापण्यात आले.
सदर प्रसंगी विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, तालुका अध्यक्ष परिक्षीत ठाकूर, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, युवक तालुका अध्यक्ष समत भोंगळे, तालुका सरचिटणीस सनी म्हात्रे, शहर सरचिटणीस हंसराज चव्हाण, युवक सरचिटणीस अमित साहू, तालुका सरचिटणीस दिनेश म्हात्रे, त्यांचे हितचिंतक कैलास भोईर , राष्ट्रवादी महिला आघडीतील, सुरेखा शिगवण, प्रशाली पांचाळ , मंदा शहा, हेमा जामकर, पुष्पा पडगळ आणि इतर कार्यकर्ते हजर होते.



















