चिंचवडकर कॉन्टॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार! रोहित पवार
पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.९.११.२०२४
महायुती सरकारवर पावरांचा घणाघात
वाकड- चिंचवडची निवडणूक आता सर्व सामान्य नागरिकांनी हातात घेतली असून, चिंचवडकर मतदार यंदा जगताप पॅटर्न हद्दपार करणार असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथील युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी, चिंचवड विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
उपस्थितांना संबोधित करताना पवार यांनी युती सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. चिंचवड मतदार संघात काहींनी फक्त नातेवाईकांना व भाच्यांना मोठं करण्याच काम केलं. निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ब्लु लाईनच घाणेरडे राजकारण करत मतदारांना वेठीस धरण्याच काम केल्याचा खळबळ जनक आरोप त्यांनी केला. राहुल कलाटे यांचे फायटिंग स्पिरिट वाखण्याजोग असून, चिंचवड मतदार संघात जगताप पॅटर्न फक्त कलाटे थांबवू शकतात असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संज्योग वाघेरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, विशाल वाकडकर, इम्रान शेख, युवासेना प्रमुख चेतन पवार, ज्योती निंबाळकर, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, रविराज काळे, सागर तापकिर, कौस्तुभ नवले, सागर चिंचवडे, स्वप्निल बनसोडे , अनिता तुतारे, वैशाली मराठे, सागर चिंचवडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
राहुल कलाटे भाषणासाठी उभे राहताच रामकृष्ण जोरदार घोषणाबाजींनी हॉल दुमदुमून गेला. ते म्हणाले, आपल्याला यापूर्वी दोन निवडणुका अपक्ष लढवाव्या लागल्या. मात्र आता शरद पवार साहेबांनी चिंचवडवर विश्वास टाकला आहे. गेल्या वीस वर्षात परिसरातील समस्या त्याच आहेत. आजवर केवळ आश्वासन देण्यात आली उमेदवारी दिली तो सार्थ करण्याची वेळ आलेली आहे.
▪️वारं फिरलंय, यंदा इतिहास घडणार – कलाटे
सत्ता नसतानाही सातत्याने शहरात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिलो. मागील दोन टर्म अपक्ष लढलो, आता आघाडीने विश्वास टाकला त्यांचे आभार. अनधिकृत घरांची मालकी प्रत्येकाला देणे प्रमुख काम असेल. भयमुक्त शहर, भ्रष्टाचार मुक्त कारभार हा प्रमुख अजेंडा आहे. आयटी पार्क बद्दल मोठया गोष्टी करतात मात्र, अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांचा आभाव असल्याने आयटी कंपण्यांच स्थलांतर होण्याची शक्यता असून, वेळीच सावध होण्याची गरज आहे. मागील दहा वर्षात एकही नवीन आयटी कंपनी आली नाही. मतदार आता शहाणे झाले असून, चिंचवडचे मतदार अनोखा चिंचवड पॅटर्न चालवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थायीमध्ये विरोध होऊनही शासनाकडून मंजूर करून घेत कलाटे यांनी १९ डीपी रस्ते केले, मग आमदार असतील तर चिंचवडचा सर्वांगीण विकास होईल.
▪️ फडणवीस सारखा खोटारडा माणूस नाही
सत्ता असताना आश्वासन पूर्ण केली नाही. प्रत्येक निवडणूकीला पुन्हा तीच तीच आश्वासन देतात असं म्हणून, मूलभूत समस्यांमुळे येथील नागरिक वैतागले आहेत. भाजपा मतदारांची दिशा भूल करत असल्याचे पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, राज्यात युती सरकार येणार हे नक्की असून, त्यासाठी प्रत्येक आमदार महत्वाचा आहे. पुढील काही दिवस सर्वांनी जागृत राहण्याचे आवाहन युवाकांना केले.
▪️दोन्ही आमदारांनी परिसर वाटून घेतला : तुषार कामठे
महापालिकेच्या आठ हजार कोटींच्या अर्थ संकल्पाची विभागणी दोन आमदारांनी केलीय रस्त्याच्या पलीकडे आणि अलीकडे असा परिसर त्यांनी वाटून घेतला आहे. प्रत्यक्षात मात्र विकासकामे शून्य आहेत. पाण्यासाठी वणवण आहे, टॅंकर माफियांचा सुळसुळाट झाला आहे. उमेदवारांचे सर्व भाचे गब्बर ठेकेदार झालेत. ज्याच्या जमिनी त्याला तिकीट…असे यांचे धोरण आहे. गेल्या वीस वर्षात आमदारांनी किती निधी आणला आणि खर्च केला ते आधी दाखवावे..नगरसेवकांनी केलेली कामे आमदार निधीतून केल्याच भासवून जनतेची दिशाभूल सुरु आहे.
▪️ नवी सांगवी येथील महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसहया मेळाव्यात रोहीत पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हातात घेतल्याने प्रस्थापितांच्या बालेकिल्याला मोठे भगदाड पडल्याची चर्चा मतदार संघात रंगली होती. यावेळी मराठवाडा विकास संघांचे अध्यक्ष अरुण पवार, माजी स्वीकृत सदस्य शिवाजी पाडुळे, निखिल चव्हाण, पंकज कांबळे यांनीही यावेळी जाहिर प्रवेश केला.



















