पीडीसीसीकडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, विशाल शिंदे
दि.०२.०७.२०२६
पुणे- राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८ हजार ४९१ पात्र कर्जदारांचा तपशील संबंधित पोर्टलवर अपलोड केला आहे.
या प्रक्रियेमुळे पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून कर्जदारांची माहिती संकलित करून ती पोर्टलवर नोंदविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तालुकानिहाय अपलोड झालेल्या कर्जदारांची संख्या :
• जुन्नर – ७,७७८
• आंबेगाव – ३,३९०
• खेड – ७,५८३
• शिरूर – ८,४५२
• मावळ – ५,१७२
• हवेली – ४,९६८
• मुळशी – २,३७८
• वेल्हा – १,८८८
• भोर – ७,२४२
• पुरंदर – ७,९०३
• बारामती – १३,७२८
• दौंड – १९,५६२
• इंदापूर – १८,५१८
प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व आधार माहिती वेळेत सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वारस नोंदणी प्रलंबित असलेल्या खातेदारांनी ती तातडीने पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे.



















