गुटखा तस्करांवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त..
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, योगेश सरदार
दि.०७.०७.२०२६
अकोला, अकोल्यात मध्यरात्रीच्या सुमारास प्रशासनाने गुटखा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली. तुकाराम मुंढे यांच्या पथकाने धाड टाकून सुमारे १२ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला.
तसेच, स्वतंत्र स्टिंग ऑपरेशननंतर अकोला पोलिसांनी सिंधी कॅम्प परिसरातून सुमारे अडीच लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
प्रशासनाच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापारावर आणखी कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.



















