खवड्या डोंगर प्रकरणाला नवा ट्विस्ट! कुणाल चांदवडे यांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय?
🔷 आयफोनच्या EMIची चर्चा; मात्र पोलिसांकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण!
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२३.०८.२०२६
छत्रपती संभाजीनगर – खवड्या डोंगरावरील कुणाल चांदवडे आणि त्यांच्या आई-वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुरुवातीला कुणाल यांच्या आयफोनच्या हट्टामुळे किंवा EMIच्या तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सोशल मीडिया व परिसरात सुरू होती. मात्र, या चर्चेला पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, तपासात कौटुंबिक वादाचा अँगल समोर येत असल्याची माहिती आहे. कुणाल यांच्या मावस काकांनीही घरातील छोट्या-मोठ्या वादामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुणालचा आई-वडिलांमधील वाद थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्यातूनच दुर्दैवी घटना घडली.
मात्र, या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रकरणाला आता नेमकं कोणतं वळण मिळणार? आयफोन EMI की कौटुंबिक वाद? पोलिसांच्या तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.



















