प्रतिनिधी, नितिन फडतरे
टेंभुर्णी पंढरपुर रोडवर झालेल्या आपघातात वाखरी बृ, येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. आज दि.१० दुपारी बाराच्या सुमारास हा आपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चक्काचुर झाला आहे. या बाबत मिळालेली माहिती असी की टेंभुर्णी पंढरपुर रोडवर अकोले बु, (ता. माढा) येथे कार व दुचाकी यांच्यात समोरा समोर धड़क झाली. या भीषण अपघाता मधे वाखरी बृ,(ता.पंढरपुर)येथील सागर शरद माने वय २३ आणि सुहास दादासाहेब शिंदे वय २८ अशी मृत्यू झालेल्या दोंघाची नावे आहेत.हे दोंघे दुचाकी वरुन टेंभुर्णी कडून पंढरपुरकडे निघाले होते. अपघाता नंतर दोघांचेही मृत्युदेह टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत.अपघाताचे वृत्त समजताच वाखरी बृ, गावात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.



















