मुंबई : (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१२.०८.१८ येथील संघटनेच्या पदाधिकारी मीटिंगमध्ये महिला आघाडी बळकट करण्याच्या दृष्टीने विशेष कार्यक्रम ठरविण्यात आला.यावेळी ऍड.रजनी आगळे यांची अध्यक्ष महिला आघाडी, मुंबई व संघमित्रा गंभीरे यांची उपाध्यक्ष महिला आघाडी, मुंबई पदी निवड करण्यात आली.ऍड.रजनी आगळे व संघमित्रा गंभीरे यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.समाजकार्या साठी आपल्या कार्यातून प्रेरणा निर्माण करणाऱ्या बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महिला आघाडीसाठी काम करणे ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.मी येत्या काळात महिलांचे एक मजबूत संघटन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या माध्यमातून तयार करण्यावर भर देईल असे ऍड.रजनी यांनी म्हटले आहे.तर उपस्थितांनी त्यांचे या नियुक्तीसाठी अभिनंदन केले.
या प्रसंगी किरण शिंदे,सुमित गायकवाड,विकास ओव्हाळ,नंदकुमार जोगदंड, अजय शिंदे,ऍड.रजनी आगळे,संघमित्रा गंभिरे,हर्षवर्धन गंभिरे (अध्यक्ष मुंबई)सुहास शिंदे (उपाध्यक्ष मुंबई),भारत साळवे (अध्यक्ष ठाणे),अनिल जाधव (अध्यक्ष पालघर),सूचित सावंत,अंकुश जाधव,सुरेश जाधव,विकास मस्के,रितेश मस्के, प्रथमेश कदम, प्रशांत साबळे,वेदांत मोरे,दिपक गायकवाड,अनिल मगरे,विजेंद्र गायकवाड,संजीवन सोनवणे,संतोष सोनवणे,सूर्यकांत साळवी,पंकज कदम,विवेक नाईक,सागर गांगुर्डे,राहुल बैसाने
यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.



















