चंद्रपूर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि. ५/०९/२०१८
चंद्रपूर-दिनांक ५सप्टेंबर ला सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती दिन शिक्षकदिना च्या दिवशी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा जिल्हा येथें मा ,विनोदजी तावडे शिक्षण मंत्री महाराष्ट राज्य,महादेवजी जाणकार पशुसवर्धनमंत्री महाराष्ट्र राज्य,मा,आदेश बांदेकर सर,मा,भरत जाधव सेनेअभिनेता तथा मान्यवर मंडळी यांच्या हस्ते सपत्नीक सहपरिवार प्रदान करण्यात आला,
चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील आशी या ग्रामीण भागातील जन्म घेहून समाज सेवचे निःस्वार्थी भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ध्येयवेडे शिक्षक मा प्रेमानंद नगराळे यांना राज्य आदर्श पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले आहे.
या वर्षी राज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून १०८ शिक्षकांना हा पुरस्कार वितरण करण्यात आले आहे, या मध्ये ३८प्राथमिक ,३९ माध्यमिक, १८आदीवासी, ८ सावित्रीबाई फुले ,२ विशेष शिक्षक, १ अपंग,१गाईड,१स्काऊट गाईड शिक्षकांचा समावेश आहे.यात प्राथमिक विभागातून चंद्रपूर मधील चिचिर्डी( तालुका भद्रावती) येथील शिक्षक मा,प्रेमानंद यशवंत नगराळे याना मांन्यवरच्या हस्ते पुरस्कारचे वितरण करण्यात आले.
त्यांनी आपल्या नौकरीची सुरवात आदिवासी दुर्गम पळसगांव ता,चिमूर २००० हजार लोकसंख्या असलेल्या गावांत त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाची सुरवात करून शाळेचे उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक चंद्रपूर जिल्ह्यातून प्राथमिक विभागातून राज्य पुरस्कार साठी पात्र ठरलेले शिक्षक आहेत.त्यांची शिकविण्याची पद्दत अन मुलांमध्ये मुलं होऊन खेळायची वृत्ती, मुलांनाही आपसूक त्यांच्या आनंददायी शिक्षणाच्या खेळात ओढून घेत असून ग्रामीण मुले शिकली पाहिजेत ,शहाणी झाली पाहिजेत,समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, हाच सरांचा मेन उद्देश ,त्यांनी शिक्षणा मध्ये वेगवेगळे प्रयोग केले .विविध शौक्षणिक साहित्याची निर्मिती केली, हसत खेळत शिक्षण यावर नगराळे सर चा भर आहे,अशा या उपक्रमशील शिक्षकाचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे,त्यांनी केलेले समाज कार्य न विसणारे आहे अशा या शिक्षकाला आदर्श पुरस्कार मिळल्याबद्दल मा शिक्षक आमदार नागोराव गाणार सर यांच्या हस्ते सुद्धा बुद्धीजीवी कर्मचारी संघ वरोरा च्या वतीने सत्कार करण्यात आला,त्यांचे पुरोगामी शिक्षक समिती भद्रावती,कास्टट्राईब कर्मचारी संघटना विकास खोब्रागडे संगणक परिचालक,निर्भीड
पत्रकार यांनी सुध्या त्यांना चे मंगल अभिनंदन केले आहे असेच कार्य त्यांच्या हातून समाज सेवेचे व शैक्षणिक क्षेत्रात लौकिक प्राप्त करावे हीच सदीछा!



















