सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अनिल माने
पाटण,
मा. दिपक तुकाराम माने (पत्रकार) रा.कराटे यांची दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा या अधिकृत संस्थेच्या पाटण तालुका अध्यक्षपदी सदर संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली.बहुजन उध्दारक महानायक राष्ट्रपुरूष राष्ट्रसंतांच्या मानवतावादी समताधिष्ठीत विचारांचा प्रचार प्रसार करणारे प्रबोधनकार मा.दिपक तुकाराम माने यांची दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया या अधिकृत संस्थेचे पाटण तालुका अध्यक्ष पदी संस्थेच्या वतीने नियुक्ती पत्र देवून नियुक्त करणेत अाले.याबाबत मा. दिपक माने यांचे सर्वस्तरातुन अनेक सामाजीक धार्मीक संस्थांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
याबाबत त्यांना आमच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त करताना असे म्हनाले की बुध्दाचा धम्म हा जर मानवतावादी आहे असे आपण आजवर फक्त सांगत आलो आहे परंतु आता सांगने नाही तर प्रत्येक्ष कृती करण्याची संधी प्राप्त झाली असल्यामुळे मी या संधीचा पुरेपूर योग्य वापर करण्याचे शक्यतेवडे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.शिवाय या संस्थेच्या शिबीरांची सुरूवात ही बहुजन साधकांची असून त्याप्रकारे बहुजनातून शिबीरास बसनाऱ्या शिबीरार्थांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून माझ्या संपर्कातील बहुजन तरूण संख्येने अल्प असला तरी स्वयंस्फुर्तीने धम्मशिबीरास नावे नोंदविण्यास पुढे येवू लागला अाहे असेही ते म्हणाले या बाबत सर्व जाती धर्मातून मा.दिपक माने यांचे अभिनंदन होत आहे.यांच्या निवडीबद्दल संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर जी त्रिभुवन, राष्ट्रीय सचिव सत्येंद्र तेलतुंबडे, राज्याध्यक्ष विशाल कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष धीरज जाधव, प्रा रवींद्र सोनावले, विजय थोरवडे, प्राणलाल माने, यशवंत दाभाडे, संतोष जगताप, शशिकांत देवकांत सूर्यकांत झिमरे, निळकंठ थेटे, प्रदीप कांबळे, सचिन कांबळे ,संजय डुबल, संजय कांबळे, प्रकाश आगाशे, समता सैनिक दलाचे कर्नल आनंदा कदम आदींनी अभिनंदन केले.



















