पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३०/१२/१८
पिंपरी, पूर्ववैमनस्यातून दापोडीतील तरुणाचा कोयत्याने वार करून तसेच सिमेंट गट्टू मारून खून करण्यात आला. अल्विन रवी राजगोपाल वय १९ रा,जयभिमनगर,दापोडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल हे दोघे जखमी झाले आहेत. ही घटना दापोडी येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. आरोपींविरोधात भोसरी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण वय २६ , रुपेश दिलीप संकपाळ वय २०, राहुल विर उर्फ पप्प्या वय,२०, निखिल वय, २१, सनी गजभिव वय २० सर्व राहणार जयभिमनगर दापोडी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. पोलीस निरीक्षक(गुन्हे) पांडुरंग गोफने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी अल्विन रवि राजगोपाल यांच्यासह अन्य दोघांवर हल्ला केला. कोयत्याने डोक्यात वार केले.तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून अल्विन याचा खून केला.



















