सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२/१/१९
फलटण,सरडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथी विध्यार्थी वयोगटातील मुला मुलींच्या बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळकरी मुलांनी विविध प्रकारच्या भाजी मंडई आणून बाजाराची शोभा वाढवली.भाजीमंडई खरेदी विक्रीला ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे उदघाटन सरडे गावचे उपसरपंच व शाळा केंद्र प्रमुख मा.दिलीप मोरे आणि निर्भिड वर्तमान पत्राचे कार्यकारी संपादक मा.गोविंद मोरे,केंद्रप्रमुख मा.रणवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन मा. सायकर सर प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री हराळे सर यांनी केले.तसेच जिल्हा परिषद शाळा साठे मा भोसले सर यावेळी शाळा कमिटीचे अध्यक्ष मा.श्री किरण मोरे यांनी उपस्थिती दर्शवली.देशामध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत सरकार सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. हेच चित्र विचारात घेता येथील शिक्षक अश्या प्रकारचे विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समाजा पुढे मांडण्याचे काम करीत आहेत.विद्यार्थ्यांना बाल वयात उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रतिसाद देताना दिसून येत आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट बाजार असा असावा अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.त्याचबरोबर प्राथमिक शाळा शेंडगे वस्ती,सरडे येथे सेवेवर रुजू असलेल्या विजयकुमार दंडिले यांचा निरोप समारंभ संपन्न झाला आणि नितीन नामदेव फरांदे यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यात आली त्यांचे अभिनंदन निर्भिड पत्रकार फलटण तालुका प्रतिनिधी सलीम भाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले.



















