सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१३/३/१९
पाटण, मल्हारपेठ पासून जवळच अंतरावर असणाऱ्या आबदारवाडी येथे सकाळी ११ वाजता विट भरून निगालेल्या ट्रकने दुचाकी स्वारास धडक दिली यामध्ये तीन वर्षाची मुलगी सई सचिन कोळी वय ३ वर्ष राहणार पाटण (मोरेगल्ली) हिचा जागीच मृत्यू झाला.सदर आपघाताची पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी आज सकाळी ११ वा. सुमारास आबदारवाडी येथील सुनील पांडुरंग कोळी यांच्या घरासमोरील उमा पेट्रोल पंप येथे कराड पाटण रोडवर मोटर सायकल वरून मनोज देसाई हा डबल सीट सायली सचिन कोळी रा.पाटण व लहान मुलगी सई सचिन कोळी यांना घेऊन मल्हारपेठकडे येताना ट्रक क्रमांक एम एच ११ एम ५१७३ वरील चालक शंकर जगन्नाथ सुर्वे यांनी रोडच्या परिस्थितीकडे न पाहता मोटर सायकल वरील मनोज देसाई यांना उडवले व यात सई सचिन कोळी हिचा ट्रकच्या मागील चाकाखाली जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला व तिची आई सायली सचिन कोळी या अपघातामध्ये जखमी झाल्या असून त्यांना कराड येथील कृष्णा दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे.पुढील तपास पी.एस.आय.अतीग्रे करत आहेत.



















