सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.१९.०६.१९
पाटण- महापुरुषांच्या दैदिप्यमान क्रांतिकारी यशाचा इतिहास आजच्या पिढीला कळावा आणी परिवर्तनाच्या दिशेने आजचा समाज वळावा यासाठी परीक्षेचा कालखंड असताना सुद्धा आपल्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास वाचून पाट करून तो प्रभावीपणे समाजात मांडण्यासाठी अविरत प्रयत्नशील असणारी कुमारी सिद्धी आनंदा टोळे इयत्ता दहावी समाज प्रभोधनकार बालवक्ता रामापुर अशा कीर्तीची अलीकडच्या काळात पाटण तालुक्याला कुमारी सिद्धी टोळे ही समाज प्रभोधक म्हणून परिचित झाली सिद्धीने किंवा तिच्या वयातल्या इतर कुणीही विशेषतः शालेय जीवनात विद्यार्थी दशेत समाज प्रभोधनात्मक इतिहास मांडण्याचं धाडस करणं हे साधं सुधं काम नव्हे. हे करत असताना शाळेच्या अभ्यासात कसलीही कसूर न करता दहावीच्या परीक्षेमध्ये ९४ % गुणांनी पास होणं हे तर पाटणसारख्या ग्रामीण भागातलं अशक्य कोटीतील यश म्हणावं लागेल कारण एकीकडे आपल्या सामाजिक स्थितीचा, परिस्थितीचा, गतीचा, प्रगतीचा आणि अदोगतीचा अभ्यास करणे आणि दुसरीकडे आपल्या राष्ट्रपुरुषाला अपेक्षीत असा स्वतंत्र्य, समता, न्याय आणि बंधुताधीष्टीत इतिहास अभ्यासून तो सामाजिक परिवर्तनासाठी आजच्या सामाजिक स्थितीला लागू पडण्याजोगा इतिहास मांडणे ही एक बाजू तर दुसरीकडे मी शाळेत आहे इयत्ता दहावीत शिकत आहे त्यामुळे मला शाळेचा अभ्यास तितक्याच काळजीने करायला पाहिजे कारण जे लोक मला मी भाषण करते म्हणून ओळखतात आणि भविष्यात ओळखणार आहेत तेच लोक मी नापास झाल्यावर मला हसणार सुद्धा आहेत या एकाच विचाराने शांत चित्ताने v देता संयमशीलपणे अभ्यास करून ९४ % गुणांनी पास झाली अशा या यशसिद्धी प्राप्त झालेल्या शिक्षणासाठी जिद्द,चिकाटी आणि मेहनत घेणाऱ्या कु.सिद्धी टोळे हिचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.



















