◆ आ. बंटीभाऊ भांगडिया यांचे अथक प्रयत्नाला यश.
चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश शेंडे
दि.१९.०६.१९
नागभीड- चिमूर मतदार संघात विकासाचा झंझावात आणनारे विकासपुरुष आ. बंटीभाऊ भांगडिया यांचे अथक प्रयत्नाने नागभीड येथील हायटेक बसस्थानक शासकीय विश्रामगृह येथे बनविण्याचे आदेश दिले आहे.जागा हस्तांतरणाचे कामाला गती गती आली आहे. मागील अनेक दिवसापासून नागभीड बसस्थानकाचे विषयावर अनेक अडचणी निर्माण करून सुद्धा आ. साहेबांनी नागभीड बस स्थानकाच्या विषय मंत्रायलाय सतत रेटून लावला व आज त्यांचे प्रयत्नाला यश आले. नागभीड शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून नागभीड बसस्थानकाचा विषय खूप महत्त्वाचा असल्याने आज शासकीय विश्रामगृह ची जागा बस स्थानकासाठी हस्तांतरणाचे आदेश दिले असून बस स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे.लवकरच कामाला गती यईल व नागभीड वासीयांना स्वच्छ सुंदर बस स्थानकाचे लाभ घेता येणार आहे.तालुक्यातील भाजपा पदाधिकारी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, नगराध्यक्ष प्रा.उमाजी हिरे,उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर, जिप सदस्य संजय गजपुरे,बांधकाम सभापती सचिन आकुलवार,बाजार समिती सभापती आवेश पठाण,बाजार समिती उपसभापती रमेश पाटील बोरकर,जेष्ठ नेते दिगंबर जी गुरपुडे,व्यापारी अजय जी काब्रा, विजय जी काब्रा,इंदूताई आंबोरकर,नितुताई येरने,मोरेश्वर ठिकरे,व्यापारी अध्यक्ष हनिफ भाई ज्यादा, जयंतीभाई पटेल,ईश्वरजी मेश्राम,मनिरामजी सहारे,प.स.सदस्य संतोष रडके,प.स. सदस्य रागिनीताई गुरपुडे, नगरसेवक रुपेश गायकवाड,नगरसेवक गौतम राऊत,नगरसेवक दशरथ उके,नगरसेविका प्रगती प्रदीप धकाते,नगरसेविका अर्चना मोजेस मरकाम, नगरसेविका दुर्गा राजेंद्र चिलबुले, नगरसेविका काजल अजय कोसे, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे,अर्थ मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब,व चिमूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष लोकप्रिय आ. बंटीभाऊ भांगडिया यांचे त्रिवार आभार मानले आहे.



















