बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल पवार दि.२२.०६.१९
बीड- सन २०१९-२० खरीप हंगामासाठी पिक कर्जाचे वाटप करावे या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी सहकार आयुक्त पुणे यांना दिले आहे. निवेदनात नमुद केले आहे की, मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने शेती कर्ज वसूली दिली. परिणामी सर्व शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. तरी संपूर्ण शेती कर्ज माफ करून किंवा पुनर्गठन करून यावर्षीच्या खरीप हंगामासाठी नवीन कर्ज वाटप करावे. राष्ट्रीयकृत,ग्रामीण,खाजगी व सहकारी बँकांनी शेती कर्जात हात आखडता घेतला असून पेरणी तोंडावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेती कर्ज न देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यला प्रवृत्त करीत असल्याचे पोलिसात गुन्हे नोंदवावेत असे निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान पिक विमा योजनेतील प्रिमियम रक्कमेच्या घोटाळ्याची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन कृषी आयुक्त पुणे यांना शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिले आहे. सन २०१५-१६ पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जाहिर झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेवर मिळत नाही.पिक विमा हफ्ता आँनलाईन पध्दतीने पिक विमा कंपन्यांना प्राप्त होतो. केंद्र आणि राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणारी रक्कमही दिली जाते. मात्र पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम घोषित झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्र आणि पिकाचा अनेकवेळा पिक विमा हफ्ता भरल्याचे सांगून पैसे देण्यास पिक विमा कंपन्या टाळाटाळ करित आहेत. याची चौकशी करून पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास आडकाठी निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी. असे निवेदन देण्यात आले आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम धिम्यागतीने करणाऱ्या तलाठी यांना जिल्हाधिकारी पाठीशी घालत आहेत.या योजनेसाठी नाव नोंदणीसाठी खाजगीलीपीक शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहेत ते तात्काळ थांबवावे यासाठी शेतकरीसंघटना जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे असे शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी सांगीतले.



















