◆ पळसगांव पेटगाव रस्तावरील पूल देतो अपघाताला निमंत्रण.
◆ बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०६.१९
चिमूर- मासळ,पळसगाव,पेटगाव रस्ताचे काम हे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे, रस्ताच्या दुतर्फा नाली खोदकाम करून अवधा १२ ते १५ फूट रस्ता रुंद असलेला रस्ता अरुंद असून बफर झोनच्या नावाखाली अरुंद रस्ता असल्याचं बोलल्या जात असून या रस्ताच्या स्लीपिंग मातीने भरून त्या वर फक्त माती झाकण्या पुरती मुरूम टाकन्यात आला आहे.जुन्या डांबरीकरण रस्तावर कुठलेही खोदकाम न करिता नवीन डांबर पसरविण्यात आला आहे. जस काही जुन्या रोडला नवीन बनिविल्याचे भासवित आहेत सदर रोड बद्दल माहिती विचारली असता रोड वरील मजूर जसे काही इंजिनीयर आहेत की काय या प्रमाणे वागत असून सामन्य नागरिकाला रोड बद्दल विचारायचे नाही आम्ही रोड ची १० वर्षाची गॅरंटी कंपनीने घेतली आहे असे भासवीत आहेत. पुन्हा रोड वरती डांबर टाकणार आहोत तुम्हला या बद्दल काही कळणार नाही,असे बेताल वक्तव करीत आहेत,पाण्याचा सुद्धा कमी वापर करण्यात येत असून फक्त पाणी मारल्याचे दाखवीत थातूर मातूर पाणी मारीत आहेत.
मांसळ पळसगांव रोड वरील नवीन पुल मात्र अपघाताला निमंत्रण देत आहे कुटल्याही प्रकारचे उंचावठा न ठेवता सरळ पूलाचे बंधकाम केले आहे. खाली जागा खोल असून वाहन चालविताना वाहन धारकांना कसरत करावी लागणार आहे वाहन चालकाला साईड देताना जीव मुठीत घेहून वाट काढावी लागत आहे, एवढा मोठा दोष असताना संबंधित बांधकाम विभाग गप्पा का? असा प्रश्न जनतेला पढला आहे.या रोडवरती भ्रष्टाचार झाला तर नसावा? असा प्रश्न निर्माण केल्या जात आहे.याच रस्तावर आत्ता ही परिस्थिती आहे तर भरपावसाळ्यात चिखल झाल्यावर किती गंभीर घटना घडेल हे नाकारता येत नाही तरी समधीत विभाग व लोक प्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेऊन दोषी आढळल्यास त्या कंत्राटदारंवार कारवाही करावी व जनतेला अपघातापासून मुक्ती द्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.



















