चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश शेंडे
दि.२२.०६.१९
नागभीड- तालुक्यातील बाळापुर खुर्द येथील चंदन प्रभाकर मैंद वय १२ वर्षे याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.पाऊस सुरु होत असतांना घरा शेजारी शेतात मुले खेळत होती त्या मधे चंदन खेळत होता. पण तो गुरे सोडायला घराकडे जातांना वीज अंगावर पडली आणि तो जागीच ठार झाला. तो ४ था वर्गात शिकत होता. घटनेच्या काही वेळा पूर्वी जवळच मौशी येथे आजी सोबत बाजारात गेला होता. बाजारातून घरी आल्या वर ही घटना घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असुन गावा मधे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूदेह आरोग्य केंद्रात असून पुढील तपास तळोधी पोलिस करीत आहे.



















