मुबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनीधी,
दादर- शिवसेना उपनेत्या आ.डॉ. निलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती झाल्या बद्दल शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात शिवसेना भवन दादर येथे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी शिवसेना उपनेत्या आ.तथा उपसभापती विधानसभा परिषद डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेला पुष्पहार व वेनी अर्पण केली. यावेळी शिवसेना गटनेते राहुलदादा कलाटे, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी निलम ताईंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवशाही व्यापारीसंघ विधी व न्याय आघाडी मुंबई कोकण विभाग अध्यक्ष श्रद्धाताई रूदो, शिवशाही व्यापारीसंघ मुंबई कार्याध्यक्ष नरेश कुरले, शिवसेना तालुका संघटक भुषन जगताप, सौरभ शेंडगे, युवासेनेचे सचिन सानप, आदी शिवसैनिक व शिवशाही व्यापारीसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.



















