◆ शाळेच्या नवीन सुसज्ज इमारतीतून सुजज्ज व गौरवशाली विद्यार्थी घडावेत.
चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०६.१९
चंद्रपूर- गेल्या अनेक वर्षांपासूनची इमारतीची मागणी होती ती आम्ही आमच्या कार्यकाळात मंजूर करून ती उभी केली व त्याचे लोकार्पण करतांना आंनद होत असून या वास्तूतून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य निर्माण करण्याचे हे केंद्र होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी लोकार्पण प्रसंगी केले.नवीन जिल्हा परिषद मुलां-मुलींची संयुक्त शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री देवराव भाऊ भोंगळे यांचा शुभहस्ते व मा. कृष्णा भाऊ सहारे जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व बांधकाम जि.प.सभापती संतोष तंगडपल्लीवार, सावली पंचायत समिती सभापती सौ छायाताई शेंडे, जिल्हा परिषद सदस्या सौ मानिषाताई चिमुरकर, व सौ योगीताताई डबले, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष तथा भाजपा तालुका महामंत्री श्री. सतीश बोम्मावार , पंचायत समिती उपसभापती श्री. तुकारामजी ठिकरे, प.स.सदस्य रवीजी बोलीवार, जेष्ठ नेते देवरावजी मुद्दमवार,अशोक पा.गड्डमवार माजी सरपंच अतुल लेनगुरे,नगरसेवक रजनीताई भडके, शाळा समिती सभापती कृष्णा राऊत,योगेश सातरे, गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे, राजू गुरनुले, पंचायत समितीचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष कृष्णा राऊत यांनी केले. संचालन प्रकाश लोणबले तर आभार कु.गेडाम हिने मानले.आज शाळेचा पहिल्या दिवशीच सावली येथील विध्यार्थ्यांनी गावातून जनजागरण रॅली काढली.आणि शाळेचा पहिला दिवस हा नवीन इमारती मध्ये होत असल्याचे पाहून विद्यार्थी व पालकांना आनंद झाला होता.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद,सेवा निवृत्त शिक्षक व मोठ्या प्रमाणात पालक व नागरिक उपस्थितीत होते.
★ पालकांच्या लढ्याला यश ★
येथील जिल्हा परिषद च्या मुला व मुलींच्या या दोन्ही शाळा बसण्या योग्य नव्हत्या त्यामुळे नवीन शाळा बांधकाम करण्यासाठी येथील पालकांनी गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष ला सुरुवात केली.मात्र प्रशासन या कडे लक्ष देत नव्हते.शाळा आमच्या हक्काची म्हणून स्वतः विधार्थी यांनी पंचायत समिती वर मोर्चा नेला व लक्ष वेधून घेतले.मागील वर्षी पर्यंत शाळा इमारत बांधून न दिल्यास अहसहकार आंदोलन पुकारले,शाळांच्या पहिल्या दिवशीच बाहेर बसून आंदोलन केले.टीसी काढा आंदोलन चा इशारा दिल्यानंतर जिप सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी पुढचा सत्र नवीन इमारती मधेच भरेल असे आश्वासन दिले आणि त्याच अनुषंगाने ७० लक्ष रुपयांची इमारत याठिकाणी बांधण्यात आली.आज त्याचे जीप अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा हस्ते उदघाटन करण्यात आले.पालक समिती चे अध्यक्ष अतुल लेनगुरे,कृष्णा राऊत,राजू गुरुनुले,योगेश सातरे व इतरांचा या लढ्याला यश आले.आणि या सर्वांनी आनंद व्यक्त करत पदाधिकारी व शासनाचे अभिनंदन केले.



















