पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२६.०६.१९
पिंपरी- जगद्गुरु संत तूकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होताच शहरातील सर्व सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत जागो जागी करण्यात आले या सोहळ्याचे निमित्तांन मातोश्री ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना तसेच दिंडीतील महिला भागिनींना बिस्किट व पाणीच्या बॉटल्स वाटत करण्यात आले या वेळी मातोश्री ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या पुढाकरांने हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. या वेळी काळेवाडी शिवसेना विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर,शिवसेना महिला विभाग संघटिका भाग्यश्री म्हस्के,जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, शिवसैनिक दत्ता गिरी,सामाजिक कार्यकर्ते धूराजी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते शिवा पिल्ले तसेच सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी ह्या उपक्रमात सहभागी झाले होते.



















