इंदापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०६.१९
इंदापूर- नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर ने इयत्ता ५ वी सेमी इंग्लिश प्रवेशासाठी इदापुर शहारातील सर्व शाळा मध्ये निवड चाचणी आयोजित केली होती. या चाचणी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर २ च्या शाळेतील विद्यार्थिनी कु.पायल अभिजित भोसले या विद्यार्थिनीने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे विशेष प्राविण्य मिळवले. नारायणदास रामदास हायस्कूल च्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. कु.पायल अभिजीत भोसले यांनी समर्पित भावनेने सेमी इग्लिंश परीक्षेसाठी अविश्रांत परीश्रम घेतल्याने हे अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यामुळे यशस्वी विद्यार्थी व प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिंनी पायल भोसले यांचे इदांपुर परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्या वेळी उपस्थित शाळा मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक यांनी मिळून तिला पुढील शिक्षणा साठी शुभेच्छा देत सत्कार केला.



















