पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२५.०९.१९
पिंपरी- पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आज (बुधवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने भाजप सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसने जूना पुणे मुंबई महामार्गावर ठिय्या मांडून धरला.त्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर काही तास ट्रॅफिक जाम झाली.या आंदोलनात भाजप-शिवसेना सरकार सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचा आरोप करण्यात आला.यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील,महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते नाना काटे,माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने,विशाल वाकडकर यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक,महिला नगरसेविका,युवक व युवती राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.



















