नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.२७.०९.१९
येवला- आड सुरेगाव येथील आंबेडकरी विचाराचे आणि चळवळीचे कार्यकर्ते आयु.सोपान सखाराम गायकवाड यांचे वडील आयु.सखाराम गोपाळा गायकवाड यांचे आज दि.२२सप्टेंबर १९ रोजी वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.पारतंत्र्यापासून ते सावतंत्र्यानंतरचा कालखंड त्यांनी अगदी जवळून पाहिलेला होता.आंबेडकरी चळवळीचा ही ते एक भाग होते.त्यांच्या अंतविधीस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. तरी त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम दि.२८.सप्टेंबर१९ रोजी सकाळी १० वा. आडसुरेगाव येथे होणार आहे.



















