नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शांताराम दुनबळे
दि.२७.०९.१९
नाशिक – सिडको परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरमालक यांच्या आर्थिक त्रासाला व गुंडागीरीला कंटाळून बांधकाम मिस्तरी कामं करणाऱ्या कामगाराला आत्महत्या करण्याची पाळी आल्याची दुदैर्वी घटना अबंड भागात चुचांळे येथे घडली मानसिक त्रास सहन न झाल्याने या कामगाराने इमारती वरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत पुंडलिक निकम (वय ३७) रा.चुचाळे शिवार अबंड मुळचा बोदवड जिल्हा जळगाव हे कुटुंबासह नाशिक मधे रहात होते बांधकाम मिस्तरी म्हणून स्वतः कामं करत होते मारूती संकुल येथील शांताराम भोर यांच्या इमारती चे बांधकामं निकम यांनी घेतले होते भोर यांनी ठरलेली रक्कम पेक्षा जास्त कामं निकम यांचे कडुन करून घेतलेले होते त्या वरून आर्थिक वादाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे निकम यांनी चिठ्ठीत लिहील्याचे अबंड पोलीस यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.निकम यांनी काल गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास घराजवळील गोदावरी प्राइङ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.अबंड पोलीस यांनी लिहिलेल्या चिठ्ठी तपासुन पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.प्रशांत निकम यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी बोदवड जळगाव येथे नेण्यात आले आहे.निकम यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल पोलीस निरीक्षक यांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असुन त्याच्या पश्चात आई वडील पत्नी व तीन लहान मुली आहेत.



















