सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,नारायण पवार
दि.२७.०९.१९
माळशिरस- तालुक्यातील बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा २९ सप्टेंबर रोजी माळशिरस येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माळशिरस तालुक्याचे तालुका अध्यक्ष विकास बनसोडे यांनी दिली या मेळाव्याला बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, आप्पासाहेब भोसले,सोलापूर जिल्हा संघटक नानासाहेब खंडागळे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे,जिल्हा सचिव ऋषिपाल बनसोडे,तालुका उपाध्यक्ष अजय साठे,हे उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामधे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा व संघटनेची भूमिका याठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत बहुजन ब्रिगेड संघटनेच्यावतीने निवडणूक लढवायची ठरल्यास संघटनेचा उमेदवार कोण असेल किंवा निवडणूक लढविण्याचे न ठरल्यास कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचाही निर्णय होण्याची शक्यता असून या संघटनेच्या भूमिकेकडे व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे कोणत्या पक्षांमध्ये जाण्याची किंवा निवडणूक लढवण्याची घोषणा करतात याची उत्सुकता माळशिरस तालुक्यातील जनतेला लागून राहिले आहे या मेळाव्याचे संपूर्ण नियोजन बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष विकास बनसोडे यांनी केले आहे.



















