सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२७.०९.१९,
सातारा- भारत निवडणूक आयोगाने ४५ सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चा निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे.त्या अनुषंगाने निवडणूकीसाठी अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण व निवडणूक कामकाजासाठी बिनचूक उपस्थित रहावे,नियुक्त केलेल्या अधिकारी,कर्मचारी यांनी निवडणूकीच्या कामात निष्काळजीपणा केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. गैरहजर राहिल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम १३४ नुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकान्वये कळविले आहे.



















