नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)येवला प्रतिनिधी,महेश दारुंटे
दि.१५.११.१९
येवला- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून मात्र येणार नाही, हाताशी झालेले पीक गेल्याने शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ मदत देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. शेट्टी यांनी अनकाई येथे शेतकरी पंडित जाधव व दत्तू देवकर यांच्या शेतातील मका व कांदे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच डॉ.सुधीर जाधव शेतकरी संघटनेचे तालुकध्यक्ष श्रावण देवरे यांनी शेट्टी यांना तालुक्यातील पिकांची झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी पाण्यात सडलेले पीक पाहून पूर्ण पणे विषारी बनले आहे. शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या समवेत चर्चा करत असताना नुकसानीची माहिती दिली. शेतकरी, शेतमजूर अडचणीत असून त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासन स्थापन व्हावे अशी आपली भूमिका असून मी महाआघाडी सोबत आहे. मका, द्राक्ष, कांदे, कापूस, सोयाबीन, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्णपणे पिके नष्ट झाल्याने मी जिल्ह्यात पाहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज असून, आम्ही लवकरच आवाज उठू असेही शेट्टी म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, रवींद्र तळेकर, युवा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण, ज्येष्ठ नेते बाबुलाल कासलीवाल, रावसाहेब सोनवणे, गणपत देवकर, आनंदा वैद्य, आदी उपस्थित होते.
• यंदा खरीप हंगामाचे पीक पावसाने धूवून नेले आहे. खरीप गेले. आता रब्बी हंगामाची शाश्वती नाही. त्यामुळे शासनाच्या दारी आवाज उठून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळवून द्यावी अशी मागणी आम्ही राजू शेट्टी कडे केली आहे.- डॉ.सुधीर जाधव, सरपंच अनकाई



















