चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२,१२,१९
चिमूर- येथील राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था यांचे माध्यमातून हैद्राबाद येथे डॉ.प्रियंकाताई रेड्डी यांच्यावर ४ नराधमांनी बलात्कार करून तिला जाळून मारण्याचे अमानुष कृत्य त्यांनी केलेले आहे व मानव जातीला शरम येईल असे वाईट काम करणाऱ्यांना कठोर अशी शिक्षा द्यावी व फाशी द्यावी असे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था शाखा चिमूर यांचे कडून श्री.नागतिलक तहसीलदार साहेब तहसील कार्यालय चिमूर मार्फत माननीय राष्ट्रपती साहेब भारत सरकार यांना देण्यात आले. निवेदन देतांना श्री.सचिन गेडाम ता.अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, श्री.प्रशांतभाऊ डवले ता.उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, श्री.रुपेश जांभूळकर ता.सचिव राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, श्री.अब्दुल रहेमान शेख ता.सहसचिव राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, श्री.हितेश सीडाम ता.सहसचिव राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, श्री. प्रेमदास वासनिक ता.संघटक राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, श्री. गणेश संघेल, ग्रामीण संघटक राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, श्री.अमित मेश्राम ता.सल्लागार राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था चिमूर, सौ.लीना उरकुडे, सौ.यशोदा गायकवाड, सौ.हेमलता जांभुळकर, सौ.वंदना गेडाम, सौ.रोहिणी गौरकार व ईतर सर्व सदस्य हजर होते व त्यांचे समक्ष निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर कोणत्याही सर्वसामान्य जनतेवर अन्याय किव्हा अत्याचार झाल्यास व त्याचे मानवी हक्क हिरावून घेतल्यास आपण आमच्या संस्थेमार्फत आपल्याला आपला हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना नेहमी कार्यरत असेल व जनतेच्या सेवेसाठी निस्वार्थी सेवा करेल असे मत श्री.प्रशांतभाऊ डवले उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आणि सामाजिक न्याय संस्था तसेच युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष चिमूर यांनी व्यक्त केले.



















