उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, वसीम सय्यद
दि.४.१२.१९
कळंब- प्रधानमंत्र्यांच्या सर्वांसाठी घरे या योजने अंतर्गत कळंब शहराला लगतच असलेल्या डिकसळ येथील ग्राम पंचायत कार्यालयाने 80 पैकी 62 घरकुलाचे काम करून सर्वच ग्रामपंचायत पुढे आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या कामाची दखल शासनाने घेऊन डिकसळ ग्रामपंचातीला घरकुल योजनेत कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डिकसळ चे सरपंच अमजद मुल्ला व ग्रामसेवक श्री. गव्हाणे आबा यांचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वाळूजे मॅडम यांच्या तर्फे जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे सत्कार करण्यात आला.
या कामगिरी बद्दल व डिकसळ ग्रामपंचायत चे सरपंच अमजद मुल्ला यांनी स्वखर्चाने सर्वप्रथम डेंग्यू प्रतिबंधात्मक औषधें फवारणी केली होती आणि याच कार्य कुशलते बद्दल त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.



















