उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३०.१२.१९
कळंब- नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपची वाट धरलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळंब पंचायत समितीचे काही सदस्य घरात लपवून ठेवले म्हणून चक्क पिस्तूलाचा धाक दाखवत दमदाटी केली याप्रकरणी राणाजगजितसिंग पाटील यांच्यासह १९ जणांवर मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी बोरगाव गावात जाऊन आमदारांसह त्यांच्या समर्थकांनी हिम्मतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घालून मारहाण केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात उस्मानाबाद-तुळजापूरचे बीजेपी आमदार व त्यांच्या १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४ जणांना घटनास्थळावरून अटक केली आहे तर आमदार राणसह इतर आरोपी फरार झाले आहेत.
याच दरम्यान आमदार राणागजितसिंग पाटील यांची चारचाकी गाडी जिचा क्रमांक एम.एच.४३बी.पी.५५११ ही गाडीही घटनास्थळावरून जप्त केली आहे. कळंब पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्य घरात ठेवल्याचा आरोपातून हिंमतराव पाटील यांना मारहाण केली असून मारहाण करणाऱ्या ४ जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, राणा यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे, दयाशंकर कंकाळ यांच्यासह ४ जणांना घटनास्थळावरून अटक केली आहे. आमदार राणा यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप असून कलम ३०२, ३२३, ५०४, ४५२, ४२७, १४३, १४८, १४९ सह शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ व २५ नुसार गुन्हा नोंद आहे. अकलूज पोलीस ठाण्यात राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील, सतीश सत्यनारायण दंडनाईक आणि त्यांचा साथीदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



















