अहमदनगर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.१२.१९
अहमदनगर- मनमाड महामार्गावर नगरमधील पत्रकार चौकात भीषण अपघातात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. कमलेश अनिल पटवा (वय ३०) रा.भुतकर वाडी, नगर असे अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे. दुधाने भरलेला टँकर नगरकडून मनमाडकडे चाललेला असताना यावेळी दुचाकीवरून आलेला युवकाला टँकरची धडक झाली. यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. पत्रकार चौकातील वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये ही घटना कैद झाल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले.



















