सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२२.०१.२०२०
महाबळेश्वर- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील घोडा व्यवसायिकांसाठी तज्ञ मार्गदर्शक रोहन मोरे जॅपलूप स्टड फार्म पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घोडा संगोपन व पालन या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे, महाबळेश्वर हॉर्स अँड पोनी असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खारखंडे,ताजुद्दीन बडाने,अरीफ डांगे, इस्लाम बडाने,डॉ.बशीर डांगे,अनिस बेपारी, शगिर बडाने,अर्बन बँकेचे संचालक जावेद वलगे,इमरान डांगे,आयुब वारुणकर,सामाजिक कार्यकर्ते तौफिक पटवेकर, गोरखनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजसेवक किरण शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.शहरातील घोडे व्यवसायिकाना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या बऱ्याच अडचणी सुटू शकतात व त्यांना ज्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यातून त्यांची सुटका होऊ शकते याच उदात्त हेतूने कायम दुर्लक्षित अशा घोडे व्यवसायिकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगीतले. रोहन मोरे यांनी घोड्यांचे आरोग्य,आजार,उपचार, आहार, संगोपन या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले घोडे व्यवसायिकांच्या शंका, प्रश्नांचे निरसन प्रत्यक्ष घोड्यावर प्रात्यक्षिक दाखवून शंकांचे समाधान केले.अनेक घोडा व्यवसायिकांनी आपल्या घोड्यास झालेल्या आजारांवर रोहन मोरे यांचा सल्ला घेतला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष सुमित कांबळे, अक्षय काकडे,नयन वने, गौरव काकडे यांनी श्रम घेतले.सूत्र संचालन प्रा. राजेश मोरे यांनी केले.किरण शिंदे यांनी आभार मानले.
अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच तालुक्यात आयोजित केला गेला, कायम दुर्लक्षित अशा घोडे व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रथमच झाला असुन असे कार्यक्रम बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपने वेळोवेळी आयोजित करावेत अशी अपेक्षा घोडे व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.



















