सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी,
दि.२४.०१.२०२०
माळशिरस- NRC/CAA/CAB/NPR च्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब अाबेंडकर यांनी राज्यभर बंदच आव्हान केले होते. हे आव्हान स्वीकारत नातेपुते शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. देशाची आर्थिक स्थिती ढासळत असून देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे, केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाच्या तिजोरीत पुरेसा निधी जमा झालेला नाही, केंद्र सरकारने देशाचा रिझर्व फंड वापरण्यास सुरुवात केली आहे. NRC /CAA / NPR / CAB सारखे देशविरोधी व संविधान विरोधी हे कायदे असल्याने या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देवून नातेपुते शहर पूर्ण दिवसभर बंद पाळला. बंदची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात करण्यात आली. या बंदला मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती, आंबेडकरी विद्यार्थी परिषद, मुस्लिम समाज नातेपुते ,यांनीही या बंदला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्तेसह धर्मअशोक सावंत, सलमान शेख, आप्पा सावंत, प्रितम साळवे, नारायण पवार, रोहित नवगिरे, नागेश कोनशिरसगी, हनुमंत सोरटे, संदेश पवार, महावीर साळवे, बबलू रणदिवे, नईम काझी, जाकीर शेख, सिकंदर मुलानी, निजाम काजी, समीर सोरटे, हयाद शेख, फिरोज फरास, शब्बीर मुलाणी, मुदतसर शेख, अल्ताप पठाण, शिवाजी सावंत, रामभाऊ सावंत, अतुल साळवे, आकाश सोरटे, रामा सोरटे, तुकाराम सोरटे, अरविंद खरात, दादा परतापे तसेच हजारो कार्यकर्तेसह ग्रामस्थ सहभागी होते .



















