पिपंरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०२.२०२०
थेरगाव- रावजी बारणे प्रशाळा अंतर्गत हेरिटेज इंग्लिश शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रावजी बारणे प्रशालाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संभाजी बारणे, माजी महापौर सौ.अनिता ताई फरांदे, माजी उपमहापौर रेखाताई गावडे, नारी शक्ती संस्था अध्यक्षा सौ.पूजाताई सराफ, माजी नगरसेविका सौ.उषाताई चोरडिया, छावा संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.अभय भोर, डॉ.एस.डी.पाटील, मराठी सिनेमाची अभिनेत्री प्रज्ञा पाटील, झेप फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश बोडके साहेब, झेप फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री.राजाराम शितोळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश विपट, दुर्गाताई भोर, गिरिजाताई सराफ शाळेचे प्रिंसिपल मनाली साळवे, पर्यावरण व जल संवर्धन समितीचे अध्यक्ष रावजी बारणे प्रशालाचे सल्लागार व निर्भिड पत्रकार वृत्तपत्राचे प्रतिनिधी श्री.मुझफ्फर इनामदार उपस्थित होते यावेळी शाळेमधील मुलांनी विविध प्रकारचे वेशभूषा करून विविध प्रकारची नृत्य करून दाखवले. या वेळी परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला.



















