सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.२६.३.२०२०
फलटण- कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.२६) मार्च रोजी खराडेवाडी ता. फलटण गावामध्ये औषध फवारणी करण्यात आली सर्व गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले असून ग्रामस्थांनी घरातच थांबून काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी तंटामुक्ती अध्यक्ष आणि पत्रकार यांनी केले आहे. कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर
गावात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली असून कोरोना संक्रमणाला परतवून लावण्यासाठी ग्रामस्थांनी घरामध्येच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व खराडेवाडी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे ,असे आवाहन सरपंच व ग्रामसेवक यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.



















