सचिन शेलार यांची ऐरोली विधानसभा अध्यक्ष पदी वर्णी.
नवी मुंबई (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी मिलिंद राऊत
दि.०३.०३ २०२३
नवी मुंबई- अखिल भारतीय सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा.आमदार अरुण गवळी व सरचिटणीस आशाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विधानसभा अध्यक्ष सचिन शेलार व युवा अध्यक्ष मयूर मढवी यांनी १००% समाजकार्य ही संकल्पना घेऊन मागील काही वर्षांपासून नवी मुंबईत अखिल भारतीय सेना घरोघरी पोहचवण्याचे काम मोठ्या जोमाने केले. कोणतेही स्वार्थ न जपता सामान्य नागरिकांना होणाऱ्या मूलभूत समस्यांवर वाचा फोडून नवी मुंबईकरांना वेळोवेळी न्याय देण्याचे समाजकार्य केले, प्रसंगी अध्यक्ष सचिन शेलार यांनी जीवाची पर्वा न करता आमरण उपोषणाचे हत्यार उपसून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धसका देत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे नेक काम केले.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच अखिल भारतीय सेनेला जनतेचा मोठा प्रतिसाद व पाठींबा मिळत असून त्यांची पक्षात काम करण्याची तीव्र इच्छा आहे. याचाच एक भाग म्हणजे दिनांक ०१ मार्च २०२३ रोजी भायखळा येथे गणेश आटोळे घणसोली चिटणीस, अस्लम सम्शुद्दीन खाटिक ऐरोली विधानसभा संघटक, सिकंदर गायकवाड अध्यक्ष, घणसोली वॉर्ड क्र. ३२, रमेश म्हलारी खरात संघटक, घणसोली वॉर्ड क्र. ३१, युवा उपाध्यक्ष जयेंद्र नामदेव दळवी, युवा संपर्क प्रमुख प्रेमनाथ घनश्याम मढवी, युवा विभाग प्रमुख विशाल मचींद्र मढवी, युवा विभाग उपप्रमुख सौरभ भांदुर्गे, युवा विभाग उपप्रमुख अभिजीत कांबळे, युवा उपविभाग प्रमुख गुरुदास ठाकूर यान कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देऊन पक्षाला बळकटी देण्यात आली.