मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०६.१९
चैत्यभूमी-बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या मुंबई,ठाणे,पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांची मिटींग येथे उत्साहात पार पडली.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी अनिल मगरे यांची ठाणे जिल्हा संघटकपदी तर माणिक उमाळे यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली.या प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकास किरण शिंदे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी सामुहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.या मीटिंगमध्ये मागील ठरावांचा व संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला.मुंबई अध्यक्ष हर्षवर्धन गंभीर,ठाणे अध्यक्ष भारत साळवे,पालघर अध्यक्ष अनिल जाधव यांनी आपापल्या जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला.संघटनेच्या पुढील कार्याचे नियोजन देखील यावेळी करण्यात आले.किरण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.अँड.रजनी आगळे यांनी आभार मानले मुंबई उपाध्यक्ष सुहास शिंदे यांनी मिटींग संपल्याचे जाहीर केले.मिटिंगचा समारोप सरणत्तय घेऊन करण्यात आला.या मिटींगला हर्षवर्धन गंभीरे, भारत साळवे, अनिल जाधव,ऍड.रजनी आगळे,सुहास शिंदे,सुमित गायकवाड,सुरेश जाधव,सुभाष चव्हाण,पंकज कदम,सूर्यकांत साळवी, अनिल मगरे,माणिक उमाळे,शैलेश बनसोडे,मंदार पवार,आशिष जवंदाळे,विलास सोनवणे,विजय गवई,संतोष मोहिते यांचेसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.



















