पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.१०.१९
पिंपरी- भोसरी परिसरातील, वाढलेली गुन्हेगारी, हफ्तेवसुली, रेड झोन,झोपडपट्टीचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, भ्रष्टाचार, जनतेच्या पैशाची अवास्तव उधळपट्टी, मतदार संघातील विकास कामांमध्ये नातेवाईकांची भागीदारी, वाहतूक समस्या, कामगारांचे प्रश्न अशा असंख्य प्रश्नांमुळे भोसरीचा विकास खुंटलेला आहे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून अपना वतन संघटनेच्या वतीने भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे याना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र तोडकर, संचालक सिद्दीकभाई शेख, शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, प्रवक्ते सॅन्ड्रा डिसोझा, तौफिक शेख यांसह मोठ्या प्रमाणवर कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी व आपल्या सर्वांगीण विकासासाठी जातीयवादी प्रवृत्तीच्या पक्षांना अद्दल घडवण्यासाठी …. भोसरी मतदार संघातील सर्व मतदाराना संघटनेच्या वतीने भोसरी मतदार संघातून अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान करण्यात आले आहे.पिंपरी- भोसरी परिसरातील, वाढलेली गुन्हेगारी, हफ्तेवसुली, रेड झोन,झोपडपट्टीचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, भ्रष्टाचार, जनतेच्या पैशाची अवास्तव उधळपट्टी, मतदार संघातील विकास कामांमध्ये नातेवाईकांची भागीदारी, वाहतूक समस्या, कामगारांचे प्रश्न अशा असंख्य प्रश्नांमुळे भोसरीचा विकास खुंटलेला आहे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून अपना वतन संघटनेच्या वतीने भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे याना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र तोडकर, संचालक सिद्दीकभाई शेख, शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, प्रवक्ते सॅन्ड्रा डिसोझा, तौफिक शेख यांसह मोठ्या प्रमाणवर कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी व आपल्या सर्वांगीण विकासासाठी जातीयवादी प्रवृत्तीच्या पक्षांना अद्दल घडवण्यासाठी ….
भोसरी मतदार संघातील सर्व मतदाराना संघटनेच्या वतीने भोसरी मतदार संघातून अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान करण्यात आले आहे.



















