सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अनिल माने
दि.१/१/१९
पाटण,संपूर्ण महाराष्ट्रात पाटण तालुका हा एकमेव तालुका आहे ज्या तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये मा.विक्रमसिंह पाटणकर आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका घडला.मा.विक्रमसिंह पाटणकर यांचा यावर्शी ७५वा वाढदिवस(अमृत मोहत्सव) साजरा करण्यात आला.पाटणकर साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त पाटण तालुक्यात अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. या मध्ये बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा घेण्यात आल्या (शरीर सौष्टव)या स्पर्धा मा.नगरसेवक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. यामध्ये पाटण श्री चा नंबर एकचा मानकरी आमोल चंद्रकांत बोलके सिध्दार्थ नगर पाटण हा ठरला. या कार्यक्रमा दरम्यान पाटण तालुक्याचे युवा नेते यूवकांचा आधारस्तंभ मा.सत्यजितसिंह पाटणकर, नगर अध्यक्ष शिंदे साहेब, सर्व नगरसेवक किरण पवार, बापुसाहेब टोळे, अजय कवडे, मुबारक सर्गवास आदी मान्यवर उपस्थित होते.



















