मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)
प्रतिनिधी,
दि.१८.०७.२०२२
नवीमुंबई – शंभर टक्के समाजकार्य हे ब्रीदवाक्य घेऊन अखिल भारतीय सेना घणसोली विभाग आक्रमक पावित्रा घेत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सुविधांसाठी आवाज उचलून सक्रिय काम करत आहे. १७ जुलैला श्री.अरुण गवळी व श्रीमती गीता अजय गवळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय सेना घणसोली विभागाचे युवा अध्यक्ष मयूर मढवी व अध्यक्ष सचिन शेलार यांच्यामार्फत घणसोली मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी युवा वर्गाचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेकडो युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून “रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान” याची प्रचीती समाजाला करून दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विशाल महाडिक, स्वप्नील हजारे, गजानन मढवी, गणेश मढवी, सुजित मढवी, शिवराज मढवी, बळीराम मढवी, पत्रकार बंधू तसेच अखिल भारतीय सेना कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



















