चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.१२.१९
🔹 वनविकास च्या विशेष पथकाची कारवाईची…
चिमूर- राखीव वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या साग झाडांची चोरीवर नियंत्रण बसण्याकरिता रात्रपाळी गस्तीवर असलेले वनविकास चे पथक सोमवारी (दि.३०) रोजी भीसि ते जांभूळविहिरा रोडवर रात्रपाळी गस्त करत होते त्या दरम्यान रात्री १०.वा. अवैधरित्या साग झाडांची तोड करून त्याची वाहतूक होत असल्याची आढळी त्यादरम्यान पथकाने ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३४ एल ७३३८ट्रोली मध्ये सागी ईमारत ४२ नग १.६२६ घमी. वणउपज जप्त करून आरोपी श्री. दिनेश वासुदेव दिघोरे रा. बीसी व इतर सात आरोपींना अटक केली. जप्त कलेली मालाची किंमत जवळपास एक लाख रुपये असून वाहनांची किंमत पाच लाख असे मुद्देमालासह सहा लाख रुपयाची जप्ती करण्यात आली आहे सदर प्रकरणात आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ५२(१) (१अ), ४१ (१)(२)(ड)(इ) तसेच महाराष्ट्र झाड तोडणे अधिनियम १९६४ कलम ५(२) प्रमाणे वन गुन्हा नोंद करून आरोपी व ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कार्यवाही विशेष पथकाचे प्रमुख श्री.रमेश बलैया वनपरिमंडळ अधिकारी व क्षेत्र सहाय्यक आशिष बायस्कर, वनरक्षक आर.पी.आगोसे, चव्हाण, घुठे इतर वनाधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींना चिमूर न्यायालयात हजर केले. पुढील तपास पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी विवेक मोरे, सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्राधिकारी ऋतुराज बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी तपास करत आहेत.



















