चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
चंद्रपूर, जिल्हातील नागभीड तालुक्यातील नागभीड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ स्वभावाचे पोलीस उपनिरीक्षक मा.छत्रपती चिडे यांचा अवैध दारूविकेत्यानी मोर्शी च्या जंगलात उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी चालवुन निर्घृणपणे बळी घेण्यात आला. चिडे यांच्या नुकताच जिल्हा पोलिस अधीक्षक मा. डा. रेड्डी साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कर करून कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक पदावर चांगले कार्य केल्याबद्धल गौरव करण्यात आला होता. त्यांनी बहुचर्चित असलेल्या ब्रम्हपुरी येथील युग नरबळी प्रकरणाचा छडा लावला होता. त्यांचा मुळगाव यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मारेगाव हे त्यांचे मूळ गांव घरचे जेमतेम परिस्थती सामन्य कुटुंबहात जन्मलेल्या छत्रपती यांनी आपल्या जीवनात सुद्धा एका विधवा स्त्री सोबत लग्न लावुन समाजसमोर आदर्श व्यक्तिमहत्वाचे धनी होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबवर व पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. सदर दारुपुरवठा व दारु विक्रेत्याचा छडा लागल्याशिवय व जिल्हात येणारी अवैध दारू चा नायनाट केला तरच चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती जिल्हा सामन्य जनतेस हा खरा चिंतनाचा विषय ठरला आहे.



















