सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०५.२०२०
महाबळेश्वर- नगर येथील नगर पालिका कर्मचारी वसाहत येथे राहणारे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सोयी सुविधांपासुन वंचित आहेत.त्यांच्या घरात जाण्यासाठी व घरातून बाहेर येण्यासाठी देखील त्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरात जाण्यासाठी बसविलेला लोखंडी जिना अक्षरशः मोडकळीस आला असून धोकादायक झाला आहे.गेल्या पाच वर्षांपासून तो जिना मरणासन्न अवस्थेत आहे.२०१८ साली देखील याबाबत स्थानिकांनी लेखी तक्रार अर्ज देऊन जीना दुरुस्ती करण्याची विनंती केली होती.अनेकदा लेखी व तोंडी तक्रार देऊन देखील या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागणीस नगरपालिकेने मात्र सोयीस्करपणे केराची टोपली दाखवल्याची परिस्थिती दिसत आहे.शहराची स्वच्छता करून शहराच्या आरोग्याची काळजी घेणारे हे कर्मचारी मात्र नगरपालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे.निर्भीड पत्रकारचा हा घटनास्थळाची परिस्थिती दाखविणारा व्हिडीओ या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या,कोविड योद्ध्यांच्या जीवनाची लढाई दर्शवतो.तर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची चिरफाड करतो



















