सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०१.०१.२०२०
सातारा- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जखात्याला आधार जोडणी नसलेल्या शेतक-यांची मराठीमध्ये यादी तयार करून ७ जानेवारीपूर्वी प्रसिद्ध करावी. त्यानंतर लाभार्थ्यांना बँका, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांच्या माध्यमातून दवंडी, मेळावे इत्यादीद्वारे आयोजन करुन जनजागृती करावी व कर्जखात्याला आधार जोडणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज सातारा येथे दिले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, अग्रणी बँकचे जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते.



















