◆ पिं.चिं. महानगरपालिकेच्या आयुक्तांना भाजपात प्रवेश व प्रवक्ता आसल्याची जाणीव करून दिली.
पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२६.०६.१९
पिंपरी- नुकतेच भाजपा च्या मध्यवर्ती कार्यालयात मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या उपस्थितीबाबत शहर युवक काँग्रेस ने आयुक्तांचा याबाबत निषेध करत त्यांना भाजपा मध्ये जाहीर प्रवेश करण्याचा खोचक सल्ला दिला आहे.त्यांच्या या कृत्याबाबत त्यांनी शहर वासियांची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा असे हि युवक काँग्रेसने पत्राद्वारे आयुक्तांना सांगितले आहे.याबाबतचे निवेदन पिं चिं मनपा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एन एस यू आय चे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भोसरी युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, आदि पदाधिकारी उपस्थित होते.



















