नाशिक(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.५.०१.२०२३
नाशिक- आश्रम शाळेमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. आधारतिर्थ आश्रम अंजनेरी ता. त्रबंकेश्वर जि.नाशिक या ठीकाणी २२ नोव्ह. २०२२ रोजी ३ वर्षाच्या बालकाचा गळा आवळून फाशी देवुन हत्या करण्यात आली आणि त्याचे शव आश्रमशाळेच्या मागे टाकुन देण्यात आले. ही घटना मनाला हादरवून टाकणारी असून मोठा गंभीर प्रकार आश्रमशाळेत घडला आहे. समाजातील सर्व स्तरावर या घटनेचा निषेध केला जात असून लोकांच्या भावना तीव्र आहेत.
या संदर्भात अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने टोकाचे पाऊल उचलून हत्या करणाऱ्या व हत्येस जबाबदार असणा-या आश्रम शाळेचे संचालकमंडळ व मुख्य आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. यावेळी मयत बालकाची आई सुजाता विशाल शिंगारे, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र जाधव, प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत, समितीचे उल्हासनगर तालुकाध्यक्ष दिपक मागाडे , प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटणीस उज्वला पंडीत, पत्रकार संदीप कटारे उपस्थित होते.
नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन या बालकाच्या खुनास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्या मुख्य आरोपीस अटक करण्यात यावी या संदर्भात सविस्तर चर्चा करुन संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निपक्षःपाती पणे चौकशी करून मयत बाळाच्या आईस पीडीत
महिलेस न्याय दिला जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी शिष्टमंडळास दिले.
न्याय न मिळाल्यास त्रबंकेश्वर तालुका पोलीस ठाण्यासमोर अ.आ.नि.स.तर्फे निदर्शने आंदोलन करण्याचा ईशारा रविंद्रदादा जाधव, अण्णासाहेब पंडीत यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.



















